राजेश अगरवाल राज्याच्या मुख्य सचिवपदी

मुंबई : राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळालेल्या सुजाता सौनिक सेवा निवृत्त झाल्या नंतर त्यांच्या जागी महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेशकुमार मीना यांची जून 2025 मध्ये राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता राजेश कुमार मीना हे 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आता त्यांच्या जागी राजेश अगरवाल हे राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत. सुजाता सौनिक सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठतेनुसार राजेशकुमार मीना यांनी 30 जून 2025 पासून राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार सांभाळला. राजेशकुमार मीना हे ऑगस्ट 2025 मध्ये सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे मुख्य सचिव पदासाठी त्यांच्याकडे जुलै आणि ऑगस्ट या जेमतेम दोन महिन्यांचाच कालावधी होता.




