मोर्शी शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता भाजप प्रणित उमेदवारांना निवडून द्या
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जाहीरसभेत आवाहन

मोर्शी /27 नोव्हेंबर : आज मोर्शी येथे महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. रेश्मा नितीन उमाळे तसेच महायुतीच्या सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली. विश्वास सेवा आणि प्रगतीच्या मार्गावर ठामपणे पुढे जाण्याची वेळ आली असून शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता भाजप प्रणित उमेदवारांना निवडून द्या त्यासाठी महायुती सरकार कुठेही कमी पडणार नाही कारण केंद्रामध्ये मोदी साहेब राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे पालकमंत्री तुमच्या विधानसभेचे आमदार उमेश यावलकर आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे सर्व मोर्शी शहराच्या पाठीशी असल्याने मोर्शी चा नगराध्यक्ष भाजपचा असल्यास कुठल्याही योजनेकरिता फंड कमी पडणार नाही अशी गवाही सर्व मोर्शीकरांना या जाहीर सभेच्या माध्यमातून आपणास देत आहे असे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथील गुरुवारला झालेल्या सोशल क्लबच्या मैदानावरील जाहीर सभेत सांगितले
बावनकुळे पुढे म्हणाले की मोर्शी शहरामध्ये लवकरच पट्टे वाटप केल्या जाईल तसेच 1 हजार घरकुलांना आजच मंजुरी दिली आहे घरकुलाकरिता दहा टक्के रेती राखून ठेवली असून ती रेती घरकुलधारकांना दिली जाईल या शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येईल आणि ते पोलीस स्टेशनला जोडले जाऊन या शहरावर नजर ठेवण्याचे काम पोलीस प्रशासन करेल ही योजना लवकरात येथे सुरू करण्यात येईल त्याचप्रमाणे येथील घराघराला प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल महसूल यंत्रणेमध्ये असलेल्या छोटे खाणी विमानाद्वारे शहरातील प्रत्येक घराचा नकाशा तयार करण्यात येईल यासाठी जवळपास चार हजार रुपये प्रत्येकी खर्च येतो परंतु नगराध्यक्षांनी प्रस्ताव पाठविल्यास ही सर्व सेवा या ठिकाणी मोफत दिल्या जाईल तसेच शहरांमध्ये सोलर प्लांट लावून प्रत्येक घराचे बिल कमीत कमी करण्याचा निर्धार सरकारने केला असून जवळपास 124 योजना राबवण्यात येईल त्याचप्रमाणे या परिसरातील शेतकर्यांचे अतिवृष्टीचे पैसे मिळण्यासाठी अकराशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून काल रात्रीलाच मुख्यमंत्री साहेबांची त्यावर सही करून घेतली आहे असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले या सभेला मोर्शीतील नागरिकांनी हजारोंच्या संख्येत उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवून महायुतीवरील आपला विश्वास ठामपणे व्यक्त केला आहे. या जाहीर सभेस जिल्हाध्यक्ष अमरावती ग्रामीण रविराजजी देशमुख, राज्यसभा खासदार डॉ. अनिलजी बोंडे, मोर्शी मतदारसंघाचे आमदार चंदू उर्फ उमेश भाऊ यावलकर, तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेशजी वानखेडे, माजी खासदार सौ. नवनीतताई राणा, सौ रेशमा उमाळे, विक्रम ठाकरे डॉ. मनोहर आंडे नितीन उमाळे सोनाली नवले नितीन राऊत नितीन पन्नासे प्रीती देशमुख सुनिता कोहळे ब्रह्मानंद देशमुख महेंद्र भातकुले माया बासुंदे ज्योती प्रसाद मालवीय सुनील ढोले सागर चौधरी सतीश लेकुरवाडे तसेच अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मंचकावर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण राऊत यांनी केले असून सौ रेशमा उमाळे यांनी सर्व मोर्शीकर जनतेचे आभार व्यक्त केले व या सभेला हजारोच्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.




