चांदूरबाजार तालुक्यात अदानी कंपनीविरुद्ध शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन

सोमवारी करणार तहसीलदार यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या

चांदूरबाजार /26 नोव्हेंबर : चांदूरबाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा येथील शेतकर्‍यांच्या जमिनी व त्यावरील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा गंभीर आरोप अदानी कंपनीवर करण्यात आला आहे. शेतकर्‍यांचे म्हणणे आहे की, कंपनीने त्यांच्या शेतजमिनी ताब्यात घेतल्या तसेच उभ्या पिकांचेही नुकसान केले, परंतु त्याबदल्यात कोणताही मोबदला अद्याप देण्यात आलेला नाही. तालुका दंडाधिकारी यांच्या कार्यालयात वारंवार धावपळ करूनही न्याय न मिळाल्याने शेतकरी हताश झाले आहेत. या अन्यायाविरुद्ध लोक विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गोपाल भालेराव आणि मुख्य संघटक रमण लंगोटे यांनी शेतकर्‍यांना एकत्र करून तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात शेतकर्‍यांनी झालेल्या नुकसानीचा आक्रोश व्यक्त करत प्रशासनाकडून तात्काळ न्याय मिळण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. शेतकर्‍यांचा रोष एवढा तीव्र होता की, मोबदला मिळाला नाही तर आत्मविनाश करीत निषेध व्यक्त करू आणि यास शासनच जबाबदार असेल, असा कठोर इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात येऊ शकतात, असे सूचित केल्याने वातावरण चिघळले. यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. दोन्ही बाजूंमध्ये काही काळ ‘तू तू – मैं मैं’ सुरू राहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आंदोलकांनी पोलिसांच्या या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला. शेतकर्‍यांचा दावा आहे की, प्रशासन व कंपनी यांच्या निष्क्रियतेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आता त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. आंदोलनकर्त्यांनी शासनाने त्वरीत हस्तक्षेप करून शेतकर्‍यांना योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे.येणार्‍या सोमवार पर्यंत यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्ही तहसीलदार यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याचा इशारा शेतकरी यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चे दरम्यान दिला.. चांदूरबाजार तालुक्यात घडणारी ही घटना शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर गंभीर प्रकाश टाकणारी ठरत आहे.यावेळी गोपाल भालेराव,रमण लंगोटे,गौरव किटुकले शेतकरी राजू वामनराव इंगळे ,नाना लक्ष्मण इंगळे ,रामा बाबाराव गुडदे ,लोकेश गणेश आवारे ,गजानन वामन इंगळे ,रामदास वामन इंगळे ,कांताबाई नाना इंगळे ,सुनिता रामदास इंगळे सविधान मोहोळ. श्रेयस बर्वे. राधिका देशमुख. योगेश निकम. सुरेंद्र गायकवाड. गौरव भवते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button