महाराष्ट्राची तिजोरी लुटण्याचा अधिकार संविधानाने दिलाय का?
नाना पटोले अजित पवारांवर भडकले

मुंबई/23 नोव्हेंबर – माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. त्यामुळं माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभा राहिलात, तर बारामतीसारखं काम तुमच्याकडे करु शकतो, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (-क्षळीं झरुरी) यांनी नळदुर्ग नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत केले. यावर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी अजित पवारांसह भाजपवर सडकून टीका केली आहे. संविधानाने तुम्हाला तिजोरी लुटण्याचा अधिकार दिलाय का? सत्ताधार्यांनी तिजोरीचे तुकडे केलेत का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय. विकासाच्या नावावर मतदान मागा भ्रष्टाचाराला खतपाणी घालू नका. तुम्ही जनतेचे नोकर आहात, पाच वर्षासाठी सत्ता तुमच्या हातात आहे. मालकासारखं बोलू नका. महाराष्ट्राची जनताचं तुमचा गर्व चूर करेल, अशी टीका देखील नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यासह सत्ताधार्यांवर केली आहे. नाना पटोले म्हणाले की, अर्थमंत्री असलं म्हणजे काय झालं? राज्याची सगळी तिजोरी तेच लुटून नेऊ शकतात आणि त्यांनाच सगळे अधिकार संविधानानं दिले असे नाही. मतदान मागत असताना विकासाच्या नावानं मागा ना. विकास काय… विकासात भ्रष्टाचाराची जास्त साथ आहे. विकासाचं नाममात्र चित्र तिथं दिसत आहे. एकीकडे फडणवीस येऊन सांगतात की, मी मुख्यमंत्री आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे सांगतात की मी उपमुख्यमंत्री आहे. या लोकांनी महाराष्ट्राच्या तिजोरीचे तुकडे करून टाकलेत का? असे त्यांनी म्हटले. नाना पटोले पुढे म्हणाले की, त्यांनी अगोदर डोक्यातून काढलं पाहिजे की, तुम्ही मालक नाही. तुम्ही जनतेचे नोकर आहात. पाच वर्षासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे.




