सविता काळे (बाळस्कर) नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार
सर्वस्तरातून पाठींबा मिळत असल्याने त्यांच्या उमेदवारीने वेधले अनेकांचे लक्ष

वरुड । 13 नोव्हेंबर – एकीकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ शेवटच्या टप्प्यात येत असतांना अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली नाही परंतु गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने महिला आणि सर्वसामान्यांचे प्रश्न उराशी बाळगून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहत असणार्या सविता काळे (बाळस्कर) या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यामुळे वरुडच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चांगली रंगत येणार आहे. सविता काळे (बाळस्कर) गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी निगडित असून वरुड तालुका महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणुन त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे, अशा स्थितीत गेल्या अनेक वर्षां पासून त्या समाजकार्यात सुद्धा कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपुर्वी वरुड शहरात चुडामनी नदीला आलेल्या महापुरामध्ये बेघर आणि नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार आजही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेस पक्षाशी त्या अनेक वर्षांपासुन एकनिष्ठ असून काँग्रेस पक्षाची त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. सविता काळे (बाळस्कर) यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केल्यामुळे निवडणुक लढवु इच्छिणार्या अनेकांनी धास्ती घेतली आहे. सविता काळे यांच्या सुस्वभावामुळे त्यांना सर्वस्तरातून पाठींबा मिळत असून सुशिक्षित आणि संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये असल्यामुळे महिलांची मोठी टिम त्यांचेकडे आहे, अशा स्थितीत त्यांच्या उमेदवारीमुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार आहे.




