भारतीय लष्करावर केवळ 10 टक्के लोकांचे नियंत्रण

राहुल गांधी यांचा भाजपवर निशाणा

नवी दिल्ली/4 नोव्हेंबर – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी देशाच्या लष्करावर 10 टक्के लोकांचे (तथाकथित उच्च जातींच्या संदर्भात) नियंत्रण असल्याचे म्हटले आहे. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या औरंगाबादमध्ये प्रचार करताना ते म्हणाले, देशातील फक्त 10 टक्के लोकांना (म्हणजेच ‘उच्च जातींना’) कॉर्पोरेट क्षेत्र, नोकरशाही आणि न्यायव्यवस्थेत संधी मिळते. अगदी लष्करही त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. उर्वरित 90 टक्के असलेले मागासवर्गीय, दलित, अनुसूचित जमाती आणि इतर अल्पसंख्याक कुठेच दिसत नाहीत.
जातनिहाय जनगणनेचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, राष्ट्रीय जातनिहाय जनगणनेमुळे व्यवस्थेबाहेर असलेल्या 90 टक्के भारतीयांची ओळख पटेल आणि त्यांच्या संवैधानिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलली जातील.आम्हाला डेटा हवा आहे. दलित, ओबीसी, महिला, अल्पसंख्याक किती आहेत. जातनिहाय जनगणनेच्या या मागणीद्वारे आम्ही संविधानाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहोत. जर 90 टक्के लोकांना हक्क मिळत नसतील तर संविधानाचे रक्षण करता येणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button