नरेंद्र मोदींमुळे देशाचे स्वातंत्र्य धोक्यात

प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक आरोप

अकोला /30 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणामुळे भारताचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. जागतिक स्तरावर इतर बहुतांश देशांचा भारताऐवजी पाकिस्तानला पाठिंबा आहे. त्यामुळे युद्ध झाल्यास पाकिस्तानचे भारतावर राज्य देखील येऊ शकेल, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केला.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत पाकि स्तान सोबत युद्धाचा धोका व्यक्त केला. निवडणुका जाऊ द्या, भारतावरील संकटावर चिंतन आणि लोकजागृती करण्याची गरज आहे. देश गुलामगिरीत असतांना शुद्र आणि अतिशुद्रांना त्रास झाला नाही तर, सवर्णांना अधिक त्रास झाला. नरेंद्र मोदींच्या राजकारणामुळे देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. आर्मी प्रमुखांनी तीन महिन्यांपूर्वी पाकिस्तानसोबत युद्ध होण्याची शक्यता वर्तवली होती. ती शक्यता खरी ठरू नये. पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर एकेकाळी भारताला मदत करणारे सगळे देश आता पाकिस्तानला मदत करत आहेत. इंग्लंड, अमेरिका, रशिया, आखाती देश पाकिस्तानच्या बाजूने आहेत, असा दावा अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.

संबंधित बातम्या

Back to top button