ऍनाकोंडाचा मुंबई गिळण्याचा प्लॅन

उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका

मुंबई /27 ऑक्टोबर : राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील वरळी डोममध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला. मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईवर दोन व्यापार्‍यांचा डोळा असल्याचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की मुंबईवर कोणाचा डोळा आहे हे सर्वांना माहिती आहे, मात्र त्यांनी नाव घेतले नाही. उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांचा अप्रत्यक्ष “अ‍ॅनाकोंडा” असा उल्लेख करत, त्याला “सर्व काही गिळणारा साप” म्हणून वर्णन केले आणि म्हटले की मुंबईला तो गिळायचा आहे, पाहू कशी गिळणार ते.

त्याचप्रमाणे, आदित्य ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळाबाबत सविस्तर सादरीकरण केले आणि सांगितले की याची सुरुवात मुंबईपासून करायची आहे. उद्धव ठाकरे यांनीही मुंबईतील हालचालींवर आणि भाजपा कार्यालयाच्या उद्घाटनासह जिजामाता उद्यानातील आगामी अ‍ॅनाकोंडा कार्यक्रमाचा संदर्भ देत टीका केली, तसेच पेंग्विनच्या भेटीमुळे पर्यटक वाढल्याचे उल्लेख करून यावरून काही टीका करण्याची गरज नाही असे सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button