आयपीएस अधिकारी पूरन कुमार यांची आत्महत्या

चंदीगड/7 ऑक्टोबर : हरियाणाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. वरुण कुमार यांनी चंदीगड येथील त्यांच्या खाजगी निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांच्या या टोकाच्या पावलामागील कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. चंदीगड पोलिस आणि अनेक हरियाणा पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मृत अधिकारी वाय. वरुण कुमार यांच्या पत्नी आयएएस अधिकारी असून, त्या 5 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी आणि इतर अधिकाऱ्यांसह जपान दौर्‍यावर गेल्या होत्या. त्या उद्या संध्याकाळी भारतात परतणार आहेत. वृत्तानुसार, पोलिसांनी अधिकारी वाय. वरुण कुमार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, तपास सुरू करण्यात आला आहे. तपास पथकाने जवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणी सर्व पैलूंचा तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button