कर्जमाफीसाठी काँग्रेसचा तिवश्यात ट्रॅक्टर मोर्चा

खा.बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूरांची सरकार विरोधात घोषणाबाजी

तिवसा /1 ऑक्टोबर : सरसकट कर्जमाफीसह शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी गुरुकुंज मोझरी येथून शेतकरी व काँग्रेस पक्षाच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ट्रॅक्टरसह हजारो शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयावर धडक देत शासनाविरोधात घोषणाबाजी केली. भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली अनेक ओशासने अजूनही अपूर्ण आहेत. यामध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करणे, निवडणुकीतील ओशासनाप्रमाणे सातबारा कोरा, कर्जमाफी ही ओशासने देऊन जनतेची मते घेतली; परंतु अजूनपर्यंत एकही ओशासन पूर्ण केले नाही. शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 50, हजार रुपये नुकसान भरपाई, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी भव्य ट्रॅक्टर मोर्चा काँग्रेसच्या वतीने काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात राष्ट्रसंत तुडकोजी महाराजांच्या समाधीस्थळापासून झाली. तिवसा शहरात मोर्चा दाख होताच शेतकर्‍यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भजन व आंधळा नव्हता, परंतु शेतकरी बाधित वाचण्यासाठी उपस्थित राहून जाहिरसभा घेण्यात आली. दोन तास राष्ट्रीय महामार्ग रोखल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आंदोलनस्थळी तिवसा पोलीस व दंगा नियंत्रण पथकाचे प्रशासनाचे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आले होते.

तिवसा तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकर्‍यांची कर्जमाफी, शेतकर्‍यांना सरसकट पन्नास हजार पर्यंत नुकसान भरपाई द्यावी, पीक विमाचे चार निकष पुन्हा समाविष्ट करावे, ज्या शेतकर्‍यांची शेती अतिवृष्टीमुळे खरडून गेली त्या शेतीच्या पुनर्वसनासाठी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामीण शेतमजुरांना कामे द्यावे, फळबाग उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. मयूर कळसे यांना देण्यात आले. यावेळी वैभव वानखडे, पंकज देशमुख, माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने, योगेश वानखडे, मुकुंद पुनसे, विशालजीत बाखडे, प्रणव गौरखेडे, जसबीर ठाकूर, अमर वानखडे, शेतु देशमुख, रितेश पांडव, सूरज धुमनखेडे, रविंद्र राऊत, गजानन अळसपुरे, दिलीप वानखडे, संदीप आमले, लुकेश केने, दीपक वानखडे, आकाश डेहनकर, प्रशांत प्रधान, अमोल पन्नासे, संदीप ठाकरे, संजय इंगळे, निवृत्ती मोकदम, तुषार लेवटे, संगीता अळसपुरे, प्रतिभा गौरखडे, अर्चना भोबे, रुपाली काळे, कल्पना दिवे, प्रिया विघ्ने यासह हजारो शेतकरी या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाले.

या सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकर्‍यांना दिलेले एकही ओशासन पाळले नाही. या देशाचा पोशिंदा शेतकरी संकटात आहे. पालकमंत्री यांना गरबा दिसतो परंतु शेतकर्‍यांचे नुकसान दिसत नाही. आम्ही शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी शांत बसणार नाही; यापेक्षाही तीव्र आंदोलन करू हा इशारा आम्ही सरकारला देतो, असे माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले. शेतकर्यांचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत आणि केंद्र व राज्य शासन शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र, आम्ही शेतकर्यांचा हात कधी सोडणार नाही आणि वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन करू, असे खासदार बळवंत वानखडे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे केवळ अदानी आणि अंबानीचेच सरकार आहे; शेतकरी आणि सर्वसामान्यांचे नाही.

संबंधित बातम्या

Back to top button