राज ठाकरेंना ठार मारण्याचा कट होता

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शमार्र्ंचा गौप्यस्फोट

* ‘अब तक 112’ चित्रपटावर मुलाखत

मुंबई/28 सप्टेंबर – मुंबई पोलिसात एकेकाळी कार्यरत असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या आयुष्यातल्या प्रसंगांवर ‘अब तक 112’ नावाचा चित्रपट येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी एक मुलाखत दिली आहे, ज्यात त्यांनी अनेक प्रसंगांचा उलगडा केला. त्यांनी सांगितले की, राज ठाकरेंना ठार करण्याचा कट होता. सादिक कालियाचा 12 डिसेंबर 1997 रोजी एन्काऊंटर केला होता. सादिक कालिया दाऊद गँगचा प्रमुख शूटर होता आणि 22 हत्यांमध्ये त्याचा सहभाग होता; तो वाँटेड होता. तो आधी अरुण गवळीच्या गँगमध्ये होता, त्यात हत्येच्या सुपारीसाठी त्याचा नंबर लागायचा नाही. त्याच्या बहिणीचा नवरा इप्तिकार देखील याच गँगमध्ये होता. इस्माईल मलबारी नावाचा दाऊदचा एक गँगस्टर होता, त्याला भेटून हे दोघे छोटा शकीलचा नंबर घेतले. सादिक कालियाने छोटा शकीलला सांगितले की “मला तुझ्या गँगमध्ये यायचं आहे,” तर छोटा शकील म्हणाला, “तुला गवळीने पाठवलं नाही, कशावरून?” सादिक म्हणाला, “तुम्ही सांगाल ते काम करतो,” आणि छोटा शकीलला बहिणीच्या नवर्‍याला ठार करण्यास सांगितले. सादिकने त्याच्या मेहुण्याला चॉपरने ठार केले, त्यानंतर तो दाऊदसाठी काम करू लागला, अशी आठवण प्रदीप शर्मा यांनी एनडीटीव्ही मराठीला दिली. अशा प्रकारच्या घटना त्यांच्या चित्रपटात दाखवल्या आहेत. 2003 मध्ये मुलुंडमध्ये ट्रेनमध्ये स्फोट झाला होता; त्यातील वाँटेड आरोपी पाकिस्तानी आणि काश्मिरी होते आणि ते बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीवर हल्ला करणार होते. आमच्याकडे त्यांच्या गाडीचा नंबर होता. सत्यपाल सिंग सह पोलीस आयुक्त होते आणि आर. एस. शर्मा सरही होते, ज्यांनी मला सांगितले, “सांभाळून जा.” मी बुलेटप्रुफ जॅकेट घालून गेलो, ज्याला दोन गोळ्या लागल्या. दुपारी 12 वाजता आम्ही त्यांचं एन्काऊंटर केलं; त्या तिघांना मातोश्रीवर हल्ला करायचा होता. त्या वेळी मी एक सेकंद जरी इकडे-तिकडे झालो असतो, तर माझा जीव गेला असता, असेही प्रदीप शर्मा यांनी सांगितले. राज ठाकरेंचा जीव कसा वाचला? आम्ही 10 ते 12 नंबर ट्रॅक करत होतो, त्यात अचानक राज ठाकरेंचा उल्लेख आला. त्यांना ठार मारण्याचा कट रचला होता आणि ते कोकण दौऱ्यावर जाणार होते. त्यांच्या जिवाला धोका असल्याचे समजल्यावर आम्ही सगळी माहिती सह पोलीस आयुक्त असलेल्या मीरा बोरवणकर यांना दिली. त्यानंतर आयुक्तांनी राज ठाकरेंना भेटून सांगितले की, “तुमच्या जिवाला धोका आहे, तुम्ही कोकण दौरा करू नका,” आणि त्यांनी तो दौरा रद्द केला, अशी माहिती प्रदीप शर्मांनी दिली.

संबंधित बातम्या

Back to top button