कृषी अधीक्षक सातपुते यांच्यावर सोयाबीन फेकले
जिल्हाप्रमुख पराग गुढे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

* ओला दुष्काळ जाहीर करण्याची शिवसेना उबाठाची मागणी
अमरावती /24 सप्टेंबर : जिल्ह्यातील शेतकर्यांची दुर्दशा पाहून शिवसेना उबाठाच्या पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले. नागपूर रोडवरील कृषी अधीक्षक कार्यालयात धडक देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन आणि कापसाची झाडे घेऊन ते कार्यालयात घुसले. जिल्हाप्रमुख पराग गुढे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी अधीक्षक सातपुते यांच्यावर झाडे फेकले. अतिवृष्टीने शेतकर्यांना मोठा फटका बसल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी केली. आठ दिवसांत निर्णय न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. बुधवारी उबाठाचे कार्यकर्ते व शेतकरी जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थाना शेजारी असलेल्या कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. अधीक्षक येताच आक्रमक शिवसैनिकांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेले सोयाबीनचे झाडे त्यांच्यावर फेकले. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. सरकार आणि प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करत शिवसेनेचे नेते शेतकर्यांसह जोरदार निदर्शने करत होते. शेतकरी आक्रमक झाले त्यामुळे पोलिस आणि सुरक्षा रक्षकांना त्यांना नियंत्रित करणे कठीण झाले. कार्यालयात घुसलेल्या शेतकर्यांनी सोयाबीनच्या शेंगा व कापसाची झाडे अधीक्षकांच्या केबिनमध्ये फेकून दिली. आंदोलनात पराग गुडधे, मनोज कडू, नरेंद्र पडोळे, प्रफुल्ल भोजने, रामा सोळंके, प्रमोद धनोकर, रामदास बैलमारे, राजेश बंड, दिलीप केणे, सचिन ठाकरे, विलास मावळे, विजय ठाकरे, संजय गोंडाणे, आदित्य ठाकरे, प्रवीण पाटील, आश्चर्य पाटील आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सावरकर, शरद वानखडे, दिलीप काळे, प्रवीण रोडे, मनोज साबळे, संजय पिंगळे, कैलास अवघड, विजय नितीन तायडे, प्रदीप गौरखेडे, तारेकर, नितीन हटवार, प्रकाश रताळे, नरेंद्र फिस्के, प्रदीप वडतकर, अिेशन नागे, व शैलेश नागे, पांडे, आशिष वाटणे, विनोद काळे, विजय खेसे, शुभम सपाटे, शरद पाटील बोडदे, नाना देऊळकर, नरेंद्र शेळके, टिल्लू तिवारी, टिल्लू शर्मा, सागर वाटणे, मनोहर कोथळकर, ऋषिकेस सगणे, नरेश वानखडे, संजय होले, घनश्याम सिंगरावडे, प्रमोद कठाळे, पंकज पिंपळकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते. शिवसेनेच्या आंदोलनामुळे प्रशासन घाबरले होते. जिल्ह्यातील परिस्थिती वाईट आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जवळपास सर्व 14 तालुक्यांमध्ये कापूस, तूर, सोयाबीन आणि इतर खरीप पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. सरकारने मंगळवारी 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.




