शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलून ‘सेंट मेरी’?

कर्नाटकात काँग्रेस सरकारचा वादग्रस्त निर्णय

-महाराष्ट्रात संताप, शिवप्रेमींकडून तीव्र निषेध
मुंबई / 11 सप्टेंबर :  कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून वारंवार महाराष्ट्राला डिवचण्याचे प्रकार समोर येत असताना आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारा वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलून ‘सेंट मेरी स्टेशन’ करण्याच्या मागणीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
काँग्रेसचे आमदार रिझवान अर्शद यांनी ही मागणी पुढे आणली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जाणारं ‘शिवाजीनगर’ स्टेशनचं नाव पुसून त्याऐवजी ‘सेंट मेरी’ करण्याची मागणी होताच, मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी त्याला संमती दर्शवून केंद्र सरकारलाही पत्र लिहिण्याची तयारी दाखवली आहे. यामुळे महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं आणि जगाचं आराध्य दैवत आहेत. अशा शिवरायांच्या नावाला काढून धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण करणं म्हणजे थेट अपमान असल्याची भूमिका शिवप्रेमींनी घेतली आहे.
कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व संताप व्यक्त केले आहे. फडणवीस म्हणाले, ज्यांनी स्वराज्य उभं केलं, त्या शिवरायांचं नाव काढून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. मी प्रार्थना करतो की ईश्वराने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी. बंगळुरू मेट्रोच्या पिंक लाईनवरील या स्टेशनच्या नावबदलाच्या मागणीवरून शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. शिवाजी महाराजांचं नाव काढणं हा सरळसरळ अवमान आहे. शिवरायांच्या स्मृतीशी छेडछाड सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या या पावलामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील वाद आणि अस्मितेचा प्रश्न अधिकच पेटण्याची शक्यता आहे.
-फडणवीसांचा संताप – काँग्रेसच्या इतिहासाकडे बोट
या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलून ‘सेंट मेरी’ करणं म्हणजे छत्रपती शिवरायांचा अपमान आहे. काँग्रेसमध्ये शिवरायांचा अवमान करण्याची परंपरा जुनीच आहे. पंडित नेहरूंपासून ही परंपरा सुरू आहे. त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकातील विचार सर्वांना ठाऊक आहेत. आज तीच मानसिकता कर्नाटक काँग्रेस सरकारमध्ये दिसतेय, असा घणाघात त्यांनी केला.

संबंधित बातम्या

Back to top button