भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यु

जालना-राजूर मार्गावर अपघात

-ट्रकची धडक; रिक्षा चक्काचूर
जालना / 17 ऑगस्ट : जालना शहराबाहेर असलेल्या जालना-राजूर मार्गावर रविवारी सायंकाळी भीषण रस्ते अपघात झाला. राजूर चौफुली परिसरात घडलेल्या या अपघातात ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की रिक्षा चक्काचूर झाली आणि तिच्यातील तीन प्रवासी जागीच ठार झाले.
मृतांमध्ये गणेश बारसी (वय 34), सुनिता वैद्य (वय 36), आणि भरत होसे (वय 33) यांचा समावेश आहे. हे तिघेही बदनापूर तालुक्यातील मांडवा गावचे रहिवासी होते. अपघाताच्या वेळेस रिक्षा जालना शहरातून राजूरकडे जात होती, तर मालवाहतूक करणारा ट्रक राजूरच्या दिशेने येत होता. या घटनेमुळे मांडवा गावावर शोककाळा पसरली आहे. मृतदेह पुढील तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघाताच्या चौकशीसाठी चंदनझिरा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button