अन्नातून विषबाधा, 3 सख्ख्या बहिणींचा मृत्यू

ठाणे : अन्नातून विषबाधा झाल्याने तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अस्नोली गावातील तळेपाडा येथे घडली आहे. काव्या (वय 10 वर्षे), दिव्या (वय 8 वर्षे) आणि गार्गी भेरे (वय 5 वर्षे) अशी तीनही सख्ख्या बहिणींची नावे आहेत. तिघींना अन्नातून विषबाधा झाली होती. यापैकी दोघींवर मुंबईतील नायर रुग्णालयात तर एकीवर नाशिक जिल्ह्यातील घोटी जवळील धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मुलींच्या नातेवाईकांनी याप्रकरणी संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी 21 जुलै रोजी तिघींना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने आईने खासगी डॉक्टरकडे नेले. नंतर शहापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिघींची प्रकृती चिंताजनक बनल्याने दोघींना मुंबईच्या नायर तर एकीला धामणगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान मृत्यूशी झुंज सुरू असताना तिघींवर काळाने झडप घातली.

संबंधित बातम्या

Back to top button