धमकावून बालिकेशी विवाह व लैंगिक शोषण

आक्षेपार्ह व्हिडिओ काढून छळ

-धामणगाव तालुक्यातील घटना
अमरावती / 12 जुलै: एका अल्पवयीन बालिकेचे आंघोळ करतानाचे आणि शारीरिक संबंधांचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून ते समाज माध्यमांवर पोस्ट करण्याची धमकी देत एका 27 वर्षीय नराधमाने तिचा लैंगिक छळ केला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने बालवयात असतानाच तिच्याशी जबरदस्तीने विवाह करुन शारीरिक अत्याचार सुरुच ठेवले. ही घटना धामणगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंगरुळ दस्तगिर पोलिसांनी आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
महेश संजय राउत (27, रा. मंगरुळ दस्तगीर) असे आरोपीचे नाव आहे. 6 मार्च 2023 पासून या प्रकरणाला सुरुवात झाली. सध्या 19 वर्ष वय असलेली पिडिता तेव्हा अल्पवयीन होती. त्यावेळी महेशने लपून या मुलीेचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ काढले. नंतर ते समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देवून त्याने मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध स्थापित केले. त्याचेही महेशने व्हिडिओ शुटिंग केले. या व्हिडिओच्या आधारे त्याने सातत्याने मुलीचे लैंगिक शोषण चालविले होते. एवढेच नाही तर मुलगी बालवयात असतानाच महेशने तिच्याशी विवाहसुद्धा केला व तिच्यावर शारीरिक अत्याचार सुरुच ठेवले.
महेशच्या जाचाला कंटाळून अखेर या पिडित युवतीने मंगरुळ दस्तगिर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. अडिच वर्षातील संपूर्ण घटनाक्रम तिने तक्रारीत नमूद केला आहे. त्याआधारे पोलिसांनी आरोपी महेश राउतवर पोस्को अर्थात बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत बलात्काराचा व अन्य गुन्हे दाखल केले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button