आ. संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल

मुंबई : आकाशवाणी आमदार निवासात कॅन्टिन कर्मचार्याला मारहाण केल्याप्रकरणी अखेर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. अपमानित करणे, मारहाण करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (11 जुलै) सकाळी माध्यमांशी बोलताना, तक्रारीची वाट न बघता गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यानुसार मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




