रब्बी हंगामसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना

एचडीएफसी एर्गोची अकोला जिल्ह्यात

अकोला/24 नोव्हेंबर- एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी या भारतातील खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या जनरल विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीला महाराष्ट्र शासनाने रब्बी हंगाम 2026-2027 साठी अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल विमा योजना (पीएमएफबीवाय) राबवण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगर-कर्जदार शेतकर्‍यांना अधिसूचित पिकांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाने अकोला जिल्ह्यासाठी अधिसूचित केलेली पिके, प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम, शेतकरी विमा हप्ता आणि अर्ज करण्याच्या अंतिम तारखा पुढीलप्रमाणे आहेत. पीएमएफबीवाय योजना शेतकर्‍यांना दुष्काळ, पूर, पावसातील खंड, भूस्खलन, चक्रीवादळ, वादळ, गारपीट, पाणी साचणे, कीड, रोग आणि इतर विविध बाह्य जोखमींमुळे होणार्‍या पीक उत्पादनातील नुकसानीपासून विमा संरक्षण प्रदान करते. उत्पादनातील घट निश्चित करण्यासाठी राज्य शासन या योजनेसाठी अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित पिकांवर पीक कापणी प्रयोगांचे (क्रॉप कटिंग एक्स्पेरिमेंट्स – सीसीई) नियोजन आणि आयोजन करेल. येस-टेक डेटा आणि आयोजित केलेल्या पीक कापणी प्रयोगांवर (सीसीई) आधारित उत्पादनाची आकडेवारी कमी असल्याचे निष्पन्न झाल्यास शेतकर्‍यांच्या उत्पादनात घट झाल्याचे मानले जाईल आणि त्यासाठी शेतकर्‍यांना विमा दावा रक्कम देय असेल. ही योजना पेरणीपूर्व, काढणी आणि काढणीनंतरच्या जोखमींसह पीक चक्राच्या सर्व टप्प्यांसाठी विमा संरक्षण देते. पीएमएफबीवाय अंतर्गत सर्व उत्पादने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून मंजूर केलेली आहेत.https://pmfby.gov.in./farmerLogin या वेबसाइटवर जाऊन योजनेसाठी स्वयं-नोंदणीचा पर्याय देखील निवडू शकतात.

अधिसूचित पिके आणि विमा तपशील

1. बागायती गहू
विमा संरक्षित रक्कम: 45,000 प्रति हेक्टर
शेतकरी विमा हप्ता: 112.50
अंतिम तारीख: 15 डिसेंबर 2026
2. हरभरा (चणा)
विमा संरक्षित रक्कम: 34,180 प्रति हेक्टर
शेतकरी विमा हप्ता: 341.80
अंतिम तारीख: 15 डिसेंबर 2026
3. उन्हाळी भुईमूग
विमा संरक्षित रक्कम: 40,600 प्रति हेक्टर
शेतकरी विमा हप्ता: 609.00
अंतिम तारीख: 31 मार्च 2027
4. रब्बी कांदा
विमा संरक्षित रक्कम: 87,600 प्रति हेक्टर
शेतकरी विमा हप्ता: 219.00
अंतिम तारीख: 15 डिसेंबर 2026

Back to top button