भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री रूपाली सोंडे यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा

वरुड । 23 नोव्हेंबर- पुसला गावातील सोंडे कुटूंबिय दरवेळी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करतात. याही वर्षी जनसेवा हीच ईश्वरसेवा असे मानुन गेल्या 10 वर्षांपासून सुरु असलेला जनसेवेचा हा उपक्रम घेण्यात आला.
आदिवासी समाज भवन आठवडी बाजार पुसला येथे रुपाली इंद्रभुषण सोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या शिबिराचे उदघाटन महापुरुषांची पूजन करुन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. त्यांना मोफत तपासणी करुन महात्मे आय बँक नागपूर येथे शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. त्या ठिकाणी 112 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. रुपाली सोंडे या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महामंत्री म्हणुन कार्यरत आहेत. त्यांच्या कुटूंबियांनी ना जात ना धर्म समाजकारणच आपले कर्म हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत 1 हजार 347 रुग्णांची यशस्वी मोफत शस्त्रक्रिया गेल्या दहा वर्षांमध्ये पार पडल्या आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्याचे वरुड पुसला तसेच अमरावती जिल्ह्यातील जनतेने अभिनंदन केले आहे. त्यांना शेकडो नागरिकांनी भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये माजी सभापती विक्रम ठाकरे, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.मनोहर आंडे, पुसला सुधार समिती शेषराव श्रीराव, शासकीय कंत्राटदार नितीन खेरडे, नगरसेवक देवेंद्र बोडखे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर काळे, भाग्येश देशमुख, नगरसेवक देवेंद्र बोडखे, भारत खासबागे, पुसला गावातील देवेंद्र कांडलकर, यादवराव तरार, दीपक बेलसरे, पुसला जिल्हा परिषद विभागातील शक्ती केंद्रप्रमुख प्रमुख पदाधिकारी तथा पुसला गावातील नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





