अमरावती शहर व जिल्ह्यातील कॉग्रेस नेत्यांची टिळक भवनात महत्त्वपूर्ण चर्चा
प्रदेश प्रभारी डॉ.श्रीवेल्ला प्रसाद यांची शिष्टमंडळाने घेतली भेट

मुंबई/19 नोव्हेंबर – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निमंत्रणानुसार आज शुक्रवार, दि. 20 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजता मुंबई येथील टिळक भवन, दादर येथे अमरावती शहर व जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी डॉ. श्रीवेल्ला प्रसाद यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुनीताताई गावंडे यांची उपस्थिती होती. या बैठकीत अमरावती शहर व जिल्ह्यातील सद्य राजकीय परिस्थिती, काँग्रेस पक्षाची संघटनात्मक स्थिती, पक्षविस्तार, कार्यकर्त्यांच्या भावना, आगामी राजकीय वाटचाल तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला. अमरावती शहर व जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आणि संघटनात्मक विषयांबाबत शिष्टमंडळाने आपली भूमिका मांडत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे लक्ष वेधले. या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर, अमरावतीचे माजी महापौर अशोक डोंगरे आणि अमरावती जिल्हा काँग्रेस औद्योगिक विभागाचे अध्यक्ष समीर जवंजाळ उपस्थित होते.





