धामणगाव रेल्वेत शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी जिल्हा परिषद सभापती रामदास निस्ताने यांच्यासह

प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत स्वागत
मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार

धामणगाव रेल्वे/18 नोव्हेंबर – धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सभापती रामदास निस्ताने यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह बुधवारी 18 नोव्हेंबर 2026 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. तिवरा रोडवरील टी.एम.सी. सभागृहात आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी प्रभारी सिरीवेल्ला प्रसाद, खा. बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, अनिरुद्ध उर्फ बबलु देशमुख आणि माजी आ. वीरेंद्र जगताप यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य सोहळ्याला उद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे प्रभारी सिरीवेल्ला प्रसाद लाभले होते. सभेला संबोधित करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या पावन भूमीत सर्वधर्मसमभावाचे विचार आम्ही पुढे नेऊ आणि या विचारांशी जोडल्या गेलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत करतो. तर प्रभारी डॉ. प्रसाद यांनी युती सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.
राज्यातील युती सरकार 60 टक्के कमिशनखोरांचे सरकार असून त्यांनी शेतकरी आणि शेतमजुरांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. या सरकारच्या काळात कंत्राटदार सुद्धा आत्महत्या करत आहेत. त्यामुळे हे युती सरकार सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळणार नाही असे खडेबोल त्यांनी सुनावले.
माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही मेळाव्याला मार्गदर्शन करताना रामदास निस्ताने यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. निस्ताने यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या या प्रवेशामुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी हाती पंजा घेतल्याने भाजपसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळ्याला खा. बळवंत वानखडे, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आ. वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलु देशमुख, राहुल येवले, अनिकेत ढेंगळे, श्रीकांत गावंडे, समीर दहातोंडे, अमोल होले, परीक्षित जगताप, अनिता मेश्राम, वर्षा देशमुख, सीमा जाधव, कविता गावंडे, मंजुषा राठी, कल्पना लांजेवार, संगीता गाडे, मोहन पाटील घुसळीकर, प्रदीप मुंदडा, नवीन कनोजिया, अजय तुपसुंदरे, सच्चिदानंद काळे, यशवंत बोरकर, नितीन दगडकर, मयूर डुबे, आशिष शिंदे, अविन इंगळे, विजय निमकर, डॉ. विनोद देशमुख, दिवाकर ठाकरे, शुभम भोंगे, धनंजय शेलोकार, विठ्ठला सपाटे, मुकेश राठी, दिनकरराव जगताप, सुनील भोगे, संजय निमकर, बिपिन ठाकरे, भाऊराव बमनोटे, संदीप दावेदार, डॉ. रोंघे, प्रशांत सबाने, ऋषी जगताप, समीर पाटील, शुभम तरोणे, राहुल ठाकरे, संजय शेंडे, नंदकुमार मानकर, मुकिंद माहुरे, मंगेश बोबडे, हेमंत कडू, प्रफुल कडू, उमेश झिबळ, सचिन समोसे, अविनाश मांडवगणे, राजाभाऊ भोगे, तुषार कोकाटे, निवृत्ती वैद्य, विलास डुकरे, विनीत टाले, चंदाताई निस्ताने, मेघा सबाने, शैलेश निस्ताने, निखिल देशमुख, दिवेश बोरकर, दर्शन भोगे, अक्षय कोरडे, धीरज गावंडे, रुपेश गुल्हाने, विशाल रोकडे, छोटू शिसोदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button