महागाईचा भडका! किरकोळ महागाई दर 6.09 टक्क्यांवर
दोन वर्षांतील उच्चांक, भाजीपाल्यानेही फोडला घाम

मुंबई /12 नोव्हेंबर: भारतातील किरकोळ महागाई दराने गेल्या दोन वर्षांतील उच्चांक गाठल्याची माहिती समोर आली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (चेडझख) गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात देशातील किरकोळ महागाई दर (ठशींरळश्र खपषश्ररींळेप) वाढून 6.09 टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्यात हा दर 5.54 टक्के होता. विशेष म्हणजे, महागाईचा हा आकडा भारतीय रिझर्व्ह बँकेने (ठइख) निश्चित केलेल्या 6 टक्क्यांच्या वरच्या मर्यादेलाही ओलांडून गेला आहे.
यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये महागाई दर 6 टक्क्यांच्या पुढे जाऊन 6.2 टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, त्यावेळी ग्राहक किंमत निर्देशांकाची (उझख) जुनी सीरिज वापरण्यात आली होती, ज्याचे आधार वर्ष 2012 होते. सध्याची आकडेवारी नवीन मालिकेतील 2024 या आधार वर्षावर आधारित आहे. मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार, ऑक्टोबरमध्ये ग्रामीण भागातील किरकोळ महागाई दर 6.63 टक्के, तर शहरी भागातील महागाई दर 5.41 टक्के नोंदवण्यात आला आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे देशातील किरकोळ महागाई दरात वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच महागाई दराने रिझर्व्ह बँकेची 6 टक्क्यांची वरची सहनशील मर्यादा ओलांडली आहे.
रिझर्व्ह बँकेने मध्यम कालावधीसाठी महागाईचे लक्ष्य 4 टक्के निश्चित केले आहे. यासाठी 2 ते 6 टक्क्यांची सहनशील मर्यादा ठेवण्यात आली आहे. मात्र, ऑक्टोबरमधील महागाई दर 6.09 टक्क्यांवर पोहोचल्याने तो या मर्यादेबाहेर गेला आहे.
कांदा, लसूण आणि अद्रक महागले-खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली वाढ हे किरकोळ महागाई वाढण्यामागचे प्रमुख कारण आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये खाद्य महागाई दर 7.74 टक्के होता. ऑक्टोबर 2026 मध्ये तो वाढून 8.94 टक्क्यांवर पोहोचला आहे. ग्रामीण भागात खाद्य महागाईचा दर 9.09 टक्के, तर शहरी भागात 8.68 टक्के नोंदवण्यात आला आहे.
चार वस्तूमध्ये सर्वाधिक वाढ
लसूण : 60.74 टक्के
चांदीचे दागिने : 52.39 टक्के
अद्रक : 48.32 टक्के
लिंबू : 47.30 टक्के





