दादा… तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस

अजितदादांच्या आठवणीने सुप्रिया सुळे भावुक

पुणे/11 नोव्हेंबर  : राज्यभरात आज भाऊबीज सण उत्साहात साजरा केला जात आहे. पवार कुटुंबाकडून दिवाळी पाडव्यासह भाऊबीजेचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबाने दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला.
राजकीय मतभेदानंतरही पवार कुटुंबात नात्याचा ओलावा कायम होता. याचाच प्रत्यय आज आला आहे. भाऊबीजेच्या दिवशी खासदार सुप्रिया सुळे या अजितदादांच्या आठवणींनी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.अजितदादांच्या आठवणी जागवताना सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आपलं एकत्र येणं, गप्पा, हसणं आम्हा बहिणींच्या घोळक्यात हरखून गेलेला तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस.

Back to top button