क्रिडा शिक्षक प्रदीप मुगल यांचे अभिनंदन पेंढारी मित्र मंडळाने केले स्वागत

अमरावती /11 नोव्हेंबर : लढ्ढा हायस्कूल येथील क्रिडा शिक्षक प्रदीप मुगल यांचा सेवानिवृती निमित्य त्यांचा अभिनंदन पेंढारी मित्र मंडळाने त्याचा निवासस्थानी जाऊन सत्कार केला यावेळी अभिनंदन पेंढारी व उपस्थितांनी त्यांचा शाल, श्रीफल, मोत्याची माला, पुष्पगुछ देऊन सत्कार केला प्रा संजय शिरभाते, पुरुषोत्तम मुंधडा, दिपक हुंडीकर, अभिनंदन पेंढारी, सुरेश रतावा, प्रा राधेश्याम यादव, विजय बर्वे, गोवर्धन गावंडे, सौ मुगल वहिनी यांनी आपल्या भाषणातुन मुगल सर हे चांगले क्रिडा मार्गदर्शक असुन त्यांनी अनेक विद्यार्थी राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत नेऊन त्यांना पदके प्राप्त करून दिले आहेत जलतरण, मल्लखांब आदी क्रिडा प्रकारात त्यांचे योगदान असुन सर्वच क्रिडा स्पर्धा मध्ये त्यांचे योगदान तथा दहीहांडी कार्यक्रम, निराधार विध्यार्थी, वनवासीसाठी सहकार्य, समाजसेवा आदी क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे व त्यांनी आपल्या सेवेत घेतलेल्या कष्टाबद्दल अभिनंदन करीत पुढील जिवन क्रिडा क्षेत्रासाठी द्यावे असे प्रतिपादन केले. श्री मुगल सर यांनी सत्कारा साठी धन्यवाद देत पुढील वाटचालीसाठी आपण क्रिडा क्षेत्रात चांगले तरुण तयार व्हावे याकरिता भरीव कार्य करण्याचा मानस व्यक्त केला कार्यक्रमाचे संचालन अभिनंदन पेंढारी तर आभार संजय शिरभाते यांनी केले.

Back to top button