जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतील

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

बारामती /11 नोव्हेंबर ;  राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या सर्व चर्चांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अतिशय सूचक विधान केले आहे. जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतील, असे त्या म्हणाल्या आहे.
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात 11 ते 18 नोव्हेंबर दरम्यान आयोजित ’जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी सुनेत्रा पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी आदिवासी विकास योजना, घरकुल वाटप आणि रोजगार शिबिरांची सविस्तर माहिती दिली. पत्रकार परिषदेच्या शेवटी पत्रकाराने सध्या राज्यभर गाजत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारला. सध्या विलीनीकरणाचा मुद्दा गाजतोय आणि मुख्यमंत्र्यांनी देखील यावर भाष्य केलंय… असा प्रश्न विचारताच सुनेत्रा पवार यांनी अतिशय संयतपणे उत्तर दिले.सुनेत्रा पवार म्हणाल्या, मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितल्याप्रमाणे आजचा आपला विषय (बिरसा मुंडा जयंती) हा अत्यंत वेगळा आहे. सध्या तुम्ही सगळेजण इथे वेगळ्या विषयाबद्दल जास्त उत्सुक आहात हे मला माहिती आहे.

Back to top button