अर्थखाते आम्हाला मिळालेच पाहिजे
अजित पवारांच्या स्मृतिस्थळावरून सुनील तटकरेंनी मांडली ठाम भूमिका

पुणे/10 नोव्हेंबर : अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण पाहता आलं असतं, असे वक्तव्य अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आठवड्याभरापूर्वीच केले. त्यानंतर आता त्यांनी म्हटले की, विलीनीकरणाबाबत पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार निर्णय घेतली. तसेच सुनील तटकरे यांनी अर्थखातं व प्रफुल पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीवरही भाष्य केलं.
सुनील तटकरे यांनी आज (10 नोव्हेंबर) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांना विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, अशा वेळी कोणतेही राजकीय वक्तव्य करणे ठरणारी नाही. मात्र तरीही विलिनीकरणाचा मुद्दा असेल, तर पक्षाच्या अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार याच त्यासंदर्भातील निर्णय घेतील. तसेच शरद पवारांना देशाच्या राजकारणातील सहा दशकांचा अनुभव आहे. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय त्यांचाही असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे जबाबदारी आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
अर्थखात्याबाबत प्रश्न विचारला असता सुनील तटकरे म्हणाले की, दिवंगत अजित पवार यांनी राज्याला विक्रमी अर्थसंकल्प दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला 2010 मध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. तो राज्याचा 50 वा अर्थसंकल्प होता. मात्र, अजितदादांनी सलग 11 अर्थसंकल्प सादर केले होते. महाराष्ट्राची आर्थिक जडणघडण घडवण्यात आणि राज्याच्या विकासाला दिशा देण्यात अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे अर्थखाते आम्हाला मिळालेच पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
शरद पवार आणि प्रफुल पटेल यांचा 10 तारखेनंतर भेटू, अशा चर्चेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. याबाबत प्रश्न विचारला असता सुनील तटकरे म्हणाले की, या भेटीमागे कोणतेही वेगळे राजकीय कारण नाही. तसेच प्रत्येक राजकीय भेटीमागे राजकीय अर्थ शोधण्याची गरज नसते. राजकारणाच्या पलीकडेही काही नाती जपावी लागतात. आपल्या राजकीय कारकिर्दीत दिवंगत वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख आणि अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या सर्वांकडून राजकारणाच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक नाती कशी जपायची आणि जोपासायची, हे शिकायला मिळाले, असे सुनील तटकरे यांनी सांगितले





