मुंबईत फटाकेबाजीने अग्निकल्लोळ! दोन दिवसांत 89 दुर्घटना

28 ठिकाणी फटाके कारणीभूत असल्याचे स्पष्ट

मुंबई/9 नोव्हेंबर: सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर फटाके फोडण्यावर निर्बंध, प्रदूषणाचा वाढता धोका आणि सुरक्षिततेबाबत वारंवार करण्यात आलेली जनजागृती यानंतरही मुंबईत फटाक्यांच्या आतषबाजीने अनेक दुर्घटनांची नोंद झाली आहे. मुंबईत दोन दिवसांत आगीच्या 89 घटना घडल्या असून, त्यापैकी 28 घटनांना फटाके कारणीभूत ठरल्याची नोंद अग्निशमन दलाकडे झाली आहे. आगीच्या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत.उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, गल्ल्या आणि फुटपाथवर फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेनेही मुंबईकरांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. प्रदूषणकारी फटाक्यांऐवजी हरित फटाक्यांचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. मात्र, या सूचना आणि निर्बंधांचा प्रत्यक्षात कितपत परिणाम झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. झोपड्यांना आग लागल्याची घटना घडली. ही आग फटाक्यामुळे लागल्याचा अंदाज आहे. या आगीवर अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळवले. प्रत्यक्षदर्शीकडून वर्तवण्यात आल्याचे मुंबई महापालिका सभागृह नेते आणि स्थनिक नगरसेवक गणेश खणकर यांनी व्यक्त केला.

Back to top button