शिक्षिकेकडून लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला अटक
शिक्षण संस्था अध्यक्षाविरुद्धही गुन्हा दाखल

अहिल्यानगर/7 नोव्हेंबर: शिक्षकेकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली तर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाविरुद्धही संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई ढालगाव येथे केल्याची माहिती नगर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी दिली.
संजय दगडू राणे (वय 55, या. घारगाव, संगमनेर) असे अटक केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे तर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश चांदमल बोरा (या. आणे, जुन्नर, पुणे) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीप्रकाश बोरा यांचा अटकेसाठी शोध सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.त्याबाबत शिक्षकेने संस्था अध्यक्ष बोरा यांची आणे येथे जाऊन भेट घेतली असता बोरा यांनी त्यांच्याकडे ठराव पाठवण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम मुख्याध्यापकाकडे जमा करण्यास सांगितले होते. यासंदर्भात तक्रारदार शिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून तक्रार नोंदवली. त्यानुसार विभागाच्या पथकाने पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली.
घारगाव येथील शाळेमध्येच मुख्याध्यापकांनी तक्रारदार शिक्षकेकडून 50 हजार रुपयांची लाचेची रक्कम पंच साक्षीदारांसमवेत स्वीकारली. त्यानंतर पथकाने कारवाई करत मुख्याध्यापक राणे यांना ताब्यात घेतले. ही रक्कम संस्था अध्यक्ष बोरा यांनी सांगितल्याने मुख्याध्यापक राणे यांनी त्यांच्या मोबाईलवरून संस्था अध्यक्ष बोरा यांच्याशी संपर्क केल्यानंतर राणे यांना ही रक्कम ठेवून घेण्यास सांगितले होते. त्यामुळे श्रीप्रकाश बोरा यांच्याविरुद्धही भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तक्रारदार शिक्षिकेची पंधरा वर्षे सेवा पूर्ण झाली असून त्यांनी त्यांच्या सेवेत बारा वर्षे पूर्ण झाल्याचे वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रशिक्षण सन 2024-25 मध्ये पूर्ण करून त्याबाबतचे प्रमाणपत्र शाळेकडे जमा केले होते. परंतु शिक्षकेला वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळाला नसल्याने त्यांनी जून 2026 मध्ये वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळण्यासाठी मुख्याध्यापक संजय राणे यांच्याकडे अर्ज दिला.





