आ. रोहित पवारांनी नांदगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांसोबत केली दिवाळी साजरी
दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकर्यांची घेतली सांत्वन भेट

नांदगाव खंडेश्वर/6 नोव्हेंबर: राष्ट्रवादीचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनी नांदगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची सांत्वन भेट घेऊन त्यांचे सोबत दिवाळी साजरी करीत काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा धीर देत दिवाळीची भेट सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिली.
राज्यभरात दुष्काळ असून नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्यांवर दुहेरी संकट असल्याने सर्वाधिक नुकसान झाले याची दखल घेऊन आ रोहित पवार यांनी नांदगाव तालुक्यातील पापड येथील दुष्काळग्रस्त शेतकरी संतोष काळसर्पे शिवनी रसुलापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंब भास्कर वंजारी यांच्या घरी सांत्वन भेट देऊन कुटुंबाला धीर देत शासकीय मदत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याशी फोनवरून चर्चा सुद्धा केली दुष्काळग्रस्त शेतकर्यांना 1 लाख रुपये मदत व शेतकरी मजूर कुटुंबास 25 हजार रुपये मदत देण्याची मागणी सुद्धा आ. पवार यांनी सरकारकडे केली यावेळी न.पं.गटनेते प्रकाश मारोटकर जिल्हाध्यक्ष अनिल जलमकर तालुकाध्यक्ष सचिन रिठे रोशन कडू डॉ. हेमंत देशमुख किशोर गुलालकरी श्रीकृष्ण रंगराचार्य संगीता ठाकरे मोहन चोरे मनोज गावंडे हितेश शेळके गोवर्धन येवतकर विशाल रिठे विनोद राऊत प्रवीण रिठे राहुल भाकरे स्वप्नील खडसे जयश्री बावणे गणेश रॉय यांचे सह शेतकरी उपस्थित होते.
नांदगाव तालुक्यात अतिवृष्टी व कर्जमाफीच्या मदतीपासून शेतकरी वंचित तालुक्यातील 30 व 31 जुलै रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने शेती पिकांचे व इतर नुकसान झाले होते पंचनामे होऊन 25 कोटी रुपये नुकसान भरपाई मागणीचा अहवाल शासनाकडे तहसीलदार यांनी पाठवून 3 महिन्याचा कालावधी झाला मात्र अद्याप नुकसान भरपाई पासून वंचित असून हा मुद्दा आगामी हिवाळी अधिवेशनात उपस्थित करावा अशी मागणी आ.रोहित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे नगराध्यक्ष सौ प्राप्ती मारोटकर नगरसेवक प्रकाश मारोटकर यांनी केली यावेळी न.पं. सभापती वासुदेव लोखंडे उपनगराध्यक्ष अब्दुल जमीर नगरसेवक मो. साजिद अमोल धवसे शेख हारून शेख शाहरुख मो. रियाज निलेश इखार गुणवंत चांदूरकर इत्यादी उपस्थित होते.





