राज्यातील 23 वनपरिक्षेत्र अधिकारी ‘सहायक वनसंरक्षक’ पदी नियुक्त

अवर सचिव महेश हंशेट्टी यांचे आदेश

अमरावती /5 नोव्हेंबर: राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने गुरुवारी, 5 नोव्हेंबर रोजी महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील 23 वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना सहायक वनसंरक्षकपदी पदोन्नती दिली आहे. सन 2025-26 या वर्षाच्या निवडसूचीमधून ‘वनक्षेत्रपाल गट-ब’ या संवर्गातील या अधिकार्‍यांना ’सहायक वनसंरक्षक, गट-अ (कनिष्ठ श्रेणी)’ या संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन या पदोन्नती प्रक्रियेमध्ये नियमित निवडसूची आणि तदर्थ निवडसूचीमधील अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. सक्षम प्राधिकार्‍यांच्या मान्यतेने या सर्व 23 अधिकार्‍यांना नवीन पदावर पदस्थापित करण्यात आले असून, यामुळे वनविभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांची रिक्त पदे भरण्यास मोठी मदत होणार आहे.

नागपूर: श्रीराम कुडमेथे, अहिल्यानगर: यशपाल दीलपाक, ताडोबा व्याघ्र प्रकल्प: प्रशांत हुमणे, नंदूरबार: पांडुरंग पाटील, कोल्हापूर: अल्का करे, नाशिक: पूजा पिंगळे, ठाणे: स्वाती डुंमरे, पुणे: विकास भामरे, जालना: वर्षा पौळ, छत्रपती संभाजीनगर: निवृत्ती चव्हाण आणि विद्या अवधुत, मेळघाट (परतवाडा): पवन जाधव, चंद्रपूर: छाया बाणखेले, धुळे: हिरालाल चौधरी, गडचिरोली: प्रशांत आवळे.
गोंदिया: दत्ता भार्गवे, चंद्रपूर: अविनाश तायनाक, नागपूर: सुषमा जाधव, सीमा मुसळे, बुलढाणा: विजय कटके, यवतमाळ: स्नेहा राऊत, नवेगाव नागझिरा: सचिन धनगे, शहापूर: प्रज्ञा वडमारे.
या आदेशातील तरतुदीनुसार, नियमित निवडसूचीत समाविष्ट असलेले श्रीराम कुडमेथे, प्रशांत हुमणे, पांडुरंग पाटील आणि तदर्थ निवडसूचीत समाविष्ट असलेले दत्ता भार्गवे यांना वयाच्या 50 ते 55 व्या वर्षीच्या पुनर्विलोकनाचे आदेश निर्गमित करण्याच्या अधीन राहूनच ही पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आली आहे.

Back to top button