अमरावतीत कोठारी ज्वेलर्सच्या दागिन्यांना पसंती

दुर्मिळ हिरे आणि पोल्की दागिन्यांचे खास प्रदर्शन

पारंपरिक कलाकुसरीसह आधुनिक दागिन्यांची आकर्षक मांडणी

अमरावती/4 नोव्हेंबर – शुद्धता, उत्कृष्ट घडण आणि ग्राहकांचा विश्वास यासाठी ओळख असलेल्या करण कोठारी ज्वेलर्सच्या वतीने अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या ‘द बिग रिव्हील’ या दुर्मिळ हिरे आणि पोल्की दागिन्यांच्या खास प्रदर्शनाला महिलांसह गृहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जयस्तंभ चौकातील एचडीएफसी बँकेजवळ सहकार भवनासमोरील कोठारी ज्वेलर्सच्या आलिशान दालनात 3 नोव्हेंबर रोजी हे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
या प्रदर्शनात आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. आकर्षक हिर्‍यांचे हार, शाही नेकलेस, उठावदार अंगठ्या आणि सुंदर कानातल्यांचे खास संग्रह ग्राहकांसाठी मांडण्यात आले होते. विशेष म्हणजे दुर्मिळ हिर्‍यांचा वापर करून तयार केलेल्या सोन्यातील हस्तनिर्मित पोल्की दागिन्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येक दागिन्यातील बारीक कलाकुसर, पारंपरिक रचना आणि शाही थाट ग्राहकांना विशेष भावला. सकाळी 11 वाजता या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनाला भेट देणार्‍या महिलांनी दागिन्यांची घडण, त्यातील बारकावे आणि विविध रचनांचे कौतुक केले.
सण, समारंभ आणि लग्नसराईसाठी वेगळ्या प्रकारचे दागिने शोधणार्‍या ग्राहकांना या प्रदर्शनातून अनेक आकर्षक पर्याय पाहण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रात आपली भक्कम ओळख निर्माण केलेल्या करण कोठारी ज्वेलर्सने ग्राहकांना दर्जेदार दागिन्यांसोबत विश्वासार्ह सेवा देण्यावर भर दिला आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन नव्या आणि पारंपरिक रचनांचा मेळ साधण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून दिसून आला. अमरावतीकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे प्रदर्शनाला चांगली रंगत आली.

Back to top button