लोकशाही रक्षणासाठी अमरावतीहून नागपूरकडे धडक

आ. रवी राणांच्या नेतृत्वात भव्य पदयात्रा

हजारो कार्यकर्ते वाहनांच्या ताफ्यासह निघणार

अमरावती /4 नोव्हेंबर– राज्यात लोकशाही टिकवण्यासाठी आणि वाढत्या गोंधळाला पायबंद घालण्यासाठी महायुतीने नागपूरच्या भूमीत मोठ्या आंदोलनाची हाक दिली असून, या विराट लढ्यात ताकदीने उतरण्यासाठी अमरावती जिल्ह्यातून आ. रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली 3,000 हून अधिक कार्यकर्ते आणि 700 गाड्यांचा ताफा गुरुवारी 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:00 वाजता नागपूरकडे निघणार आहे. यशवंतराव स्टेडियम ते मॉरिस कॉलेज चौक या मार्गावर निघणार्‍या या जनमोर्चातून महायुतीचे मोठे शक्तिप्रदर्शन घडणार असून, जनतेच्या अधिकारांच्या रक्षणासाठी सर्वसामान्य नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे थेट आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात सध्याच्या घडीला लोकशाही मूल्यांची पायमल्ली थांबवणे आणि जनतेच्या हिताचे रक्षण करणे गरजेचे बनले आहे. याच भूमिकेतून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वतीने उपराजधानी नागपुरात एका मोठ्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात अमरावती जिल्ह्याचा आवाज बुलंद करण्यासाठी बडनेरा मतदारसंघाचे आ. रवी राणा यांनी पुढाकार घेतला असून संपूर्ण जिल्ह्यातून कार्यकर्त्यांची मोठी जमवाजमव झाली आहे.
नागपूर शहरात होणार्‍या या पदयात्रेचा मार्ग यशवंतराव स्टेडियमवरून सुरू होऊन गोवारी टी पॉईंट मार्गे मॉरिस कॉलेज चौकापर्यंत जाणार आहे. या संपूर्ण मार्गावर महायुतीचे कार्यकर्ते पायी चालत घोषणाबाजी करत जनआंदोलन उभारणार आहेत. अमरावतीहून निघणार्‍या या भव्य मोहिमेत सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि युवकांचा मोठा सहभाग राहणार असून रस्त्यावरून शेकडो वाहनांचा ताफा एकाच वेळी नागपूरच्या दिशेने कूच करेल.
लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि सामान्य माणसाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी या मोर्चात प्रत्येकाने सामील व्हावे, अशी साद आ. रवी राणा यांनी घातली. या नियोजन बैठकीला आणि आंदोलनाच्या पूर्वतयारीलासुनील राणा, प्रकाश साबळे, सोनाली नवले, सचिन भेंडे, राजा बांगडे, बाळू इंगोले, विनोद गूहे, विनोद जायलवाल, नितीन बोरेकर, नाना आमले, प्रशांत वानखडे, भूषण पाटणे, दीपक सम्राट, संजय हिंगासपुरे, सुमती ढोके, अजय जयस्वाल, किशोर जाधव, शैलेश मेघवानी, रजनी डोंगरे, अशोक पांडे, योगेश विजयकर, नंदा सावदे, हर्षल रेवणे, संदीप कांबळे, अनुप अग्रवाल, सागर लोखंडे, करन डेंडवाल, साक्षी उमप, पवन दळवी, बबलू गाडे, मंगेश इंगोले, सुरज चौधरी, मुन्ना ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Back to top button