पंढरपुरच्या रिंगण सोहळ्यात अमरावतीचे 38 सायकलपटू
5 महिलांचाही समावेश

* दररोज 50 ते 60 किमीचा प्रवास
* राज्यभरातील पाच हजार सायकलपटूंचा सहभाग
अमरावती / 1 जुलै: आरोग्य बळकट राहण्यासाठी नियमित सायकल चालवणार्या 38 सायकलपटूंनी खास आषाढी एकादशी सोहळ्याच्या पोर्शभूमीवर अमरावती ते पंढरपूर हे अंतर चार दिवसात गाठलं आहे. विशेष म्हणजे सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश देत राज्यभरातील एकूण 5 हजार सायकलपटू 21 जूनला पंढरपूरला एकत्र आले. त्यातून सायकलस्वारांचा अनोखा रिंगण सोहळा पंढरपुरात रंगला. रोज पहाटे पाच वाजल्यापासून अमरावती सायकल असोसिएशनचे सदस्य सायकलवर स्वार होऊन 20 किलोमीटर तर कधी 25 तर अनेकदा 50 ते 60 किलोमीटर पर्यंत सायकल चालवतात. पन्नास ते साठ सायकलपटू असणार्या या संघटनेत सहा ते सात महिला सायकलपटू आहेत. यापैकी वर्ष सदर, शालिनी महाजन, दिव्या मेश्राम, जयमाला देशमुख आणि शालिनी सेवानी या पाच महिला सायकलपटू अमरावती ते पंढरपूर अशा सायकल प्रवासात सहभागी होत्या. आमच्या घरच्यांनी दिलेला पाठिंबा आणि अमरावती सायकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी आणि सचिव अतुल कळमकर यांनी निर्माण केलेल्या विेशासामुळं आम्ही पंढरपूरची वारी सायकलद्वारे करू शकलो, असं या महिला सायकलपटू सांगतात. 18 जूनला श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवीचं दर्शन घेऊन 38 सायकलपटू पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले. पहिला मुक्काम वाशिम जिल्ह्यात कामारगाव येथे झाला. यानंतर पुढे वाशीम येथून प्रवास पुढे सुरू झाला. वादळ, पाऊस असतानाही सायकल चावताना ’जय हरी विठ्ठला’च्या जयघोषात अतिशय खराब रस्त्यांवरुन वाट काढत आत्मविेशासानं या सायकलपटूंनी 600 किलोमीटर सायकल प्रवास पूर्ण केला. अमरावती शहरात गत दहा वर्षांपासून अमरावती सायकल असोसिएशनच्या माध्यमातून अनेक सायकलप्रेमींचं संघटन झालंय. सायकल असोसिएशनच्यावतींनं चिखलदरा तर कधी मुक्तगितीपर्यंत सायकलपटू अनेकदा पोचलेत. यावर्षी पहिल्यांदा सायकलंन थेट पंढरपूर गाठण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे केवळ अमरावती सायकल असोसिएशनच नव्हे तर राज्यभरातील सर्वच जिल्ह्यातून सायकलपटू पंढरपूरच्या वारीत सहभागी झाल्याची माहिती अमरावती सायकल असोसिएशनचे सदस्य राजू महाजन यांनी दिली. अमरावतीच्या 38 सायकलपटूंसह राज्यभरातून पंढरपूरला पोचलेल्या एकूण 5 हजार सायकलपटूंचा रिंगण सोहळा चंद्रभागा नदीचा काठावर रंगला.




