विसावा वृद्धाश्रम अचलपूर येथे अन्नदान
स्व. बंकाबाई वाकोडे यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त

अमरावती /1 नोव्हेंबर – स्व. बंकाबाई सेवकराम वाकोडे यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी वृद्धाश्रमात अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला.त्यांच्या कन्या नलिनी प्रेमकर तायडे व शीला प्रकाश वानखेडे तसेच नात अर्पिता प्रेमकर तायडे व नेहा रोशन पखारे यांनी वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांना भोजनदान केले. यावेळी सर्वांनी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत वेळ घालवून त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला. स्व. बंकाबाई वाकोडे यांच्या प्रेम, माया आणि संस्कारांचा वारसा जपत त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम आयोजित करण्यात आला. केवळ स्मरण करण्यापेक्षा गरजूंची सेवा करून त्यांच्या आठवणींना उजाळा देणे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.





