गरिबी निर्मूलन ही घोषणा नव्हे, दृढ संकल्प

जागतिक बँकेच्या अहवालाचे पंतप्रधान मोदींकडून स्वागत

नवी दिल्ली/1 नोव्हेंबर  : 2011 ते 2023 दरम्यान भारतातील 49.6 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. या काळात गरिबीच्या दरात 90% घट झाली. देशामधील गरिबीतील ही ऐतिहासिक घट म्हणजे संधींच्या निर्मितीमध्ये झालेली एक मोठी पिढीगत प्रगती आहे. गरिबी निर्मूलन हे आमच्यां सरकारसाठी केवळ एक घोषणा नसून, एक दृढ वचनबद्धता आहे, असे म्हपणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक बँकेच्या एका अहवालाचे स्वागत केले.
जागतिक बँकेच्या अहवालाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हशणाले, गेल्या 6 वर्षांत रोजगाराच्या 13.4 कोटी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. ही संख्या कामकाजाच्या वयातील लोकसंख्येत झालेल्या वाढीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. यासोबतच देशातील आर्थिक असमानताही कमी झाली आहे. वास्तविक, जागतिक बँकेने ऑक्टोबरमध्ये इंडिया पॉव्हर्टी अँड इक्विटी ब्रीफ या नावाने अहवाल जारी केला.
त्यानुसार, भारतातील अत्यंत गरिबीचा दर 2011 मध्ये 27.1% होता, जो 2023 मध्ये घटून 2.6% राहिला. पूर्वी दर चार भारतीयांपैकी एकापेक्षा जास्त व्यक्ती गरिबीत होती, ती आता सुमारे 38 भारतीयांपैकी एकावर आली आहे. वर्ल्ड बँकेच्या मते भारतात जगातील सर्वात वेगाने गरिबी कमी झाली आहे. गरिबी निर्मूलन हे सरकारसाठी केवळ एक घोषवाक्य नसून, दृढ संकल्पआहे.आर्थिक असमानता मोजणार्‍या गिनी निर्देशांकात 20% पेक्षा जास्त घट झाली आहे. हा निर्देशांक कमी होऊन 23.0 वर पोहोचला आहे. या अहवालानुसार, दररोज सुमारे 400 (4.20) पेक्षा कमी कमाई करणार्‍या लोकांची संख्या 57.7% वरून कमी होऊन आता केवळ 16.1% राहिली आहे. अंदाज आहे की, 2028 पर्यंत हा आकडा कमी होऊन 12.1% वर येईल, असे त्यांरनी नमूद केले.

Back to top button