केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ

सरकारकडून 10 हजार कोटींहून अधिक निधी मंजूर

नवी दिल्ली/28 ऑक्टोबर : ऐन दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचार्योंच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे केंद्र सरकारचे तब्बल 48 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांची दिवाळी गोड होणार आहे.
वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून वर्षातून दोनदा (जानेवारी आणि जुलै) महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते. याआधी कर्मचार्याांचा महागाई भत्ता 60 टक्के होता. मंत्रिमंडळाच्या ताज्या बैठकीत यामध्ये 3 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने आता हा भत्ता वाढून 63 टक्के झाला आहे. या वाढीव डीएमुळे सरकारी कर्मचार्याांच्या मासिक वेतात घसघशीत वाढ होणार असून, सणासुदीच्या काळात हा मोठा दिलासा मानला जात आहे.
महागाई भत्त्यातील या वाढीसाठी केंद्र सरकारने तिजोरीतून तब्बल 10,016 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात बाजारात उत्साह पाहायला मिळणार असून, कर्मचार्यांचच्या हातात अतिरिक्त पैसा खुळखुळणार आहे.

Back to top button