गणितज्ञ महेश काकडे यांना रामानुजन पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली/7ऑक्टोबर  : भारतीय गणितज्ञ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (खखडल), बंगळुरू येथील प्राध्यापक महेश काकडे यांना 2026 चा रामानुजन पुरस्कार जाहीर झाला आहे. संख्या सिद्धांतातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
हा पुरस्कार इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरेटिकल फिजिक्स आणि इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जातो. विकसनशील देशांमध्ये राहून उत्कृष्ट गणितीय संशोधन करणार्‍या 45 वर्षांखालील गणितज्ञांचा या पुरस्काराने गौरव केला जातो. महेश काकडे यांनी अल्जेब्रिक नंबर थिअरी, म्हणजेच बीजगणितीय संख्या सिद्धांत या गणिताच्या शाखेत महत्त्वाचे संशोधन केले आहे.

Back to top button