मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली अमित शाहांची भेट

नवी दिल्ली/7 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची सविस्तर माहिती देत राज्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) निकषानुसार अधिकाधिक मदत मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. फडणवीस यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे शाह यांची भेट घेऊन राज्यातील दुष्काळाची स्थिती आणि राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यासंदर्भातील निवेदनही राज्य सरकारच्या वतीने शाह यांच्याकडे सादर करण्यात आले. महाराष्ट्रातील 265 पेक्षा अधिक तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून या भागांसाठी दुष्काळी उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अधिकाधिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी शाह यांच्या निदर्शनास आणून दिले. फडणवीस यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे शाह यांची भेट घेऊन राज्यातील दुष्काळाची स्थिती आणि राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यासंदर्भातील निवेदनही राज्य सरकारच्या वतीने शाह यांच्याकडे सादर करण्यात आले. महाराष्ट्रातील 265 पेक्षा अधिक तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून या भागांसाठी दुष्काळी उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अधिकाधिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी शाह यांच्या निदर्शनास आणून दिले.

एमपीएससी आंदोलन हायजॅक
महाराष्ट्रातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील एमपीएससी आंदोलन हायजॅक झाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांऐवजी तेथे राजकीय नेत्यांचे आंदोलन सुरू आहे. तसेच सीजेपी आणि काँग्रेसमध्ये अराजकतेची शर्यत लागली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील एमपीएससी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. एमपीएससीच्या आंदोलनात मूळ विषय सोडून पूर्णपणे राजकीय मुद्दे मांडले जात आहेत. आंदोलनस्थळी राजकीय कार्यकर्ते असले तरी तिथे विद्यार्थीही उपस्थित आहेत.

Back to top button