वाढत्या महागाईत सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

आरबीआयच्या व्याज दरात 0.25 टक्क्यांनी वाढ

गृहकर्ज, वाहन कर्ज महागणार

नवी दिल्ली 7 ऑक्टोबर : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीने व्याज दरांसंबंधीचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. बुधवारी (7 ऑक्टोबर) आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 3 दिवसीय एमपीसी बैठकीमधील निर्णय जाहीर केले. यामध्ये रेपो रेटमध्ये (ठशिे ठरींश) 25 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.25 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट 5.25 टक्क्यांवरून 5.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरावर होण्याची शक्यता आहे.
बुधवारी (7 ऑक्टोबर) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णय जाहीर केला. महागाईचा वाढता दबाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ लक्षात घेऊन व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. पण, सध्याच्या बैठीकीत ही वाढ झाल्याने सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यामुळे बँकांसाठी ठइखकडून कर्ज घेणे महाग होणार आहे. त्याचा परिणाम बँकांच्या कर्जदरांवर होऊ शकतो. त्यामुळे गृहकर्ज किंवा वाहन कर्जाचा व्याजदर वाढल्यास ग्राहकांच्या मासिक हप्तेमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
तब्बल 4 वर्षांनी आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. फेब्रुवारी 2025 नंतर रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर ठेवले होते. फेब्रुवारी 2023 मध्ये आरबीआयने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवून 6.50 टक्के इतका केला होता. त्यानंतर, 2023-24 या आर्थिक वर्षात रेपो रेटचा हा दर कायम होता. त्यानंतर फेब्रुवारी 2025 पासून रिझर्व्ह बँकेने सातत्याने रेपो रेटमध्ये कपात करत तो 5.25 टक्क्यांपर्यंत आणला होता. त्यानंतर हा रेट तब्बल 4 वर्षे कायम ठेवला गेला.

Back to top button