24 तासांत योग्य निर्णय घेणार

मराठा आरक्षणाबाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे विधान

मनोज जरांगे पाटील यांचा गैरसमज दूर करणार

मुंबई/30 ऑगस्ट– मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत राहिला आहे. शनिवारी, 28 ऑगस्टपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे आपले आंदोलन सुरु केले आहे. अशामध्ये या दखल घेत रविवारी (30 ऑगस्ट) उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची मी येत्या दोन दिवसांत भेट घेणार आहे.
पुढील 24 तासांत योग्य निर्णय घेऊ, असे मोठे विधान त्यांनी यावेळी केले आहे.गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने टीका केली होती. यावर मंत्री उदय सामंत म्हणाले की, माझे मित्र म्हणून तसेच आमचे संबंध राजकारणाच्या आंदोलनाच्या पलीकडचे आहेत. म्हणूनच मी त्यांना विनंती करतो की, कोणाच्या सांगण्यावरून किंवा गैरसमजामधून एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वाईट बोलू नये. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही वाईट बोलू नये. त्यांनी गैरसमज दूर करावा. शासन मराठा समाजाच्या मागण्यांसोबत आहे. मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मी जरांगे यांच्या संपर्कात आहे, असे म्हणत त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले. परभणी येथील शिवसेनेच्या मेळाव्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली होती. यावर मंत्री सामंत म्हणाले की, मनोज जरागे यांचा उपोषणाचा कार्यक्रम आहे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा आयोजित केलेला नव्हता. हा जर जरांगे यांचा गैरसमज झाला असेल तर तो साफ चुकीचा आहे. दोन महिन्यांपासूनच हा युवा संवाद आणि शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. 7 जुलैला हा कार्यक्रम होता, पण एकनाथ शिंदेंची तब्येत नसल्यामुळे त्या दिवशी हा कार्यक्रम होऊ शकला नाही. कोणालाही काउंटर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा हा कार्यक्रम नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, मराठा आरक्षणाच्या संदर्भात शंका निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम घेतला नव्हता. मराठी समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न शेतकरी मेळाव्यामधून झालेला नाही. मनोज जरांगे यांनी खासदार जाधव यांना फोन केला, त्यावेळेला हजारो लोक जमलेहोते. शिंदे साहेबांना हा मेळावा करावा लागला, असे ते पुढे म्हणाले.
उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये झालेल्या बोलण्याबद्दलही यावेळी सविस्तर माहिती दिली. एकनाथ शिंदेंचा मला शनिवारी फोन आला होता. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं आंदोलनात होत राहतील, मागण्या देखील मान्य होतील. पण, जरांगेंनी आपल्या प्रकृतीचीदेखील काळजी घेतली पाहिजे. असे सांगणारे नेतृत्व हे शिवसेनेचे नेतृत्व आहे. त्यामुळे जरांगेंचा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तो खोटा आहे. त्यांनी शिंदेंच्याबाबतीतील गैरसमज दूर करावा. एकनाथ शिंदेंची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देणारी ठरली आहे. असे ते यावेळी म्हणाले. खासदार संजय (बंडू) जाधव यांनी देखील वेळोवेळी मनोज जरांगे यांचे समर्थन केले आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button