दिल्लीला जाणारी कांदा एक्स्प्रेस शेतकर्यांनी अडवली
भाव कोसळण्याचा धोका, केंद्राच्या निर्णयाला विरोध

नाशिक /26 ऑगस्ट : देशभरात कांद्याचे दर वेगाने वाढत असल्याने ते नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. नाशिक येथील बफर स्टॉकमधून कांदा एक्स्प्रेसच्या विशेष रेकद्वारे 5 प्रमुख शहरांमध्ये 35 रुपये प्रति किलो दराने कांदा विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी आज (26 ऑगस्ट) लासलगाव रेल्वे स्थानकातून ही कांदा एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना करण्यात येत आहे. मात्र कांदा एक्स्प्रेसला शेतकर्यांना विरोध केला असून लासलगाव रेल्वे स्थानकात रेल्वे रोखली आहे.
केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांमार्फत खरेदी करण्यात आलेल्या 1.21 लाख मेट्रिक टन बफर स्टॉकपैकी सुरुवातीला 840 मेट्रिक टन कांदा दिल्लीलापाठवला जात आहे. याशिवाय नवी दिल्ली, चेन्नई, मदुराई, एर्नाकुलम (कोची) आणि गुवाहाटी या जास्त मागणी असणार्या1 शहरांमध्ये हा कांदा 35 रुपये किलोने उपलब्ध करून दिला जाईल. सणासुदीच्या काळात कांद्याचे किरकोळ दर 50 ते 65 रुपयांपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा साठा बाजारात आणला जात आहे. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापार्याांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
सध्या स्थानिक बाजार समित्यांमध्ये कांद्याला 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल (35 ते 40 रुपये किलो) दर मिळत आहे. मात्र, सरकारने बफर स्टॉक बाजारात उतरवल्यास स्थानिक बाजारपेठेतील भाव कोसळतील आणि शेतकर्या्ंचे मोठे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सरकार फक्त ग्राहकांचे हित पाहते, मग शेतकर्यां च्या हिताचे काय? असा सवाल करत बफर स्टॉकचा कांदा दिल्लीला जाऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांनी मंगळवारी (25 ऑगस्ट) दिला होता. सरकारने शेतकरीविरोधी धोरण तातडीने न बदलल्यास तीव्र रास्ता-रोको आणि आंदोलन छेडण्याचा इशारा देखील शेतकर्या्ंकडून देण्यात आला होता. याचपार्श्वभूमीवर आज प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर यांच्यासह शेतकर्यांनी कांदा एक्स्प्रेस अडवली. यावेळी सेंट्रल वखार महामंडळ आणि रेल्वे अधिकार्यांची बाचाबाची झाली.




