महारेराने मंजूर केली राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पांना 4 महिन्यांची मुदतवाढ

पश्चिम आशियातील युद्धाचा राज्यातील गृहनिर्माण क्षेत्राला बसला फटका

28 फेब्रुवारी नंतरच्या सर्व प्रकल्पांना महारेराची सवलत

मुंबई /7 ऑगस्ट– पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे आपल्या राज्यातील घरांचे बांधकाम चांगलेच रखडले असून महारेराने राज्यातील सर्वच गृहप्रकल्पांना चार महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी किंवा त्यानंतर ज्या घरांचा ताबा मिळणे अपेक्षित होते, त्या सर्वांना ही मुदतवाढ आपोआप लागू होणार आहे. यासाठी बांधकाम व्यावसायिकांना महारेराकडे कोणतीही पायपीट किंवा अर्ज करण्याची अजिबात गरज पडणार नाही.
परदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सिमेंट, पोलाद आणि इतर बांधकाम साहित्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या अचानक आलेल्या अडचणीमुळे राज्यातील बांधकाम व्यवसाय अडचणीत सापडला होता. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने देशातील सर्व रेरा प्राधिकरणांना प्रकल्पांना चार महिन्यांचा अतिरिक्त वेळ देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महारेराने तातडीने पावले उचलत हा निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो घरधारकांना दिलासा मिळणार असला तरी हक्काच्या घरासाठी अजून काही महिने वाट पाहावी लागणार आहे. महारेराचे माध्यम सल्लागार राम दोतोंडे यांनी या आदेशाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button