आंदोलनादरम्यान पोलिसांनी संयम बाळगावा:सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली/5 ऑगस्ट ; सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी संसद मार्च हिंसाचारासंदर्भात सांगितले की, निदर्शनांदरम्यान कायदा लागू करणार्‍या यंत्रणांनी संयम बाळगावा. जरी काही दिशाभूल झालेले लोक दगडफेक करत असले तरी, पोलिसांनी तरुणांना शांत करणे, त्यांना समजावणे आणि त्यांचे म्हणणे ऐकणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालय 20 जुलैच्या ’संसद चलो’ मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास तयार झाले आहे. यामध्ये आयोजकांवर हिंसाचार भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. कॉकरोच जनता पार्टी च्या अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी संसद मार्च बोलावला होता. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची व न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने ही याचिका अशाच दुसर्‍या याचिकेसोबत जोडली आहे. ही याचिका निवृत्त हवाई दलाचे अधिकारी मनीष कुमार सोलंकी यांनी दाखल केली आहे.नीट पेपरफुटीच्या विरोधात उगझ ने 20 जून ते 25 जुलैपर्यंत जंतर-मंतरवर निदर्शने केली होती.

संबंधित बातम्या

Back to top button