‘नशामुक्त भारत अभियान’ उत्साहात
विविध स्पर्धांचे आयोजन

अमरावती/3 ऑगस्ट: युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या मेरा युवा भारत केंद्रातर्फे विद्याभारती महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ’नशामुक्त भारत अभियान 2026’ अंतर्गत विविध कला स्पर्धांचा सोहळा पार पडला. ’विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्याभारती महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. मिथिलेश राठोड अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक किरण वानखेडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रज्ञा येनकर उपस्थित होत्या. यावेळी श्री. वानखेडे यांनी, युवकांनी केवळ स्पर्धा म्हणून या कार्यक्रमाकडे न बघता समाजात जनजागृतीची मोहीम हाती घ्यावी, तरच नशामुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य होईल, असे सांगितले. या अभियानांतर्गत आठ कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. लघुपट, रील स्पर्धेत गुंजन शेवाटकर, संगीत, लोकगीत स्पर्धेत हिमांशी, स्लॅम पोएट्री, कविता सादरीकरणात कृपाली गव्हाणे, घोषवाक्य लेखन स्पर्धेत भूमिका चारतुरकर, नृत्य स्पर्धेत महेक गुप्ता, पथनाट्य, मूकनाट्य स्पर्धेत अनुज माहुलकर, चित्रकला स्पर्धे अवंतिका पाटील, वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेत मुस्फेरा शेख यांची प्रथम क्रमांक पटकविला.




