सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर आंदोलक बिथरले

पोलिस आंदोलकांना अटक करु शकतात

नवी दिल्ली/29 जुलै-कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली एक अंतरिम आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार सध्या जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यानुसार तपास चालूच ठेवावा, असे या आदेशात म्हणण्यात आले आहे. याच अंतरिम आदेशानंतर सीजेपीने नाराजी व्यक्तत करत पुन्हा एकदा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. यानंतर दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. दोन बडे अधिकारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
दिल्लीत तातडीची बैठक-कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले होते की, ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानंतर पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरूच राहिला, तर कॉकरोच जनता पार्टी लवकरच देशभरात मोठ्या प्रमाणावर शांततापूर्ण आंदोलन सुरू करेल.’ या इशार्‍यानंतर राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. गुप्तचर विभागाचे प्रमुख महेश दीक्षित आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन हे संसद भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट गेल्याची माहिती समोर आली आहे. सौरव दास यांची सोशल मीडिया पोस्ट काय?-अशातच सौरव दास यांनी या प्रकरणी सोशल मीडिया पोस्ट केली असून त्यात लिहिले की, सीजेपीने आंदोलनासंदर्भातील जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशामुळे संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे. आदेशातील क्रमांक 4 मध्ये सरकारांना आधीपासून दाखल असलेल्या एफआयआरवर पुढील कारवाई आणि तपास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे, हा अत्यंत गंभीर चिंतेचा विषय आहे.हा आदेश 25 जुलै 2026 रोजी भारत सरकारने देशातील युवकांना दिलेल्या स्पष्ट आश्वासनाच्या थेट विरोधात आहे. त्या आश्वासनानुसार सर्व एफआयआर मागे घेतले जातील आणि शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही आंदोलनकर्त्यावर थेट किंवा अप्रत्यक्षपणे कारवाई केली जाणार नाही. याच ठाम आश्वासनावर आणि सरकारच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवून सीजेपीने देशव्यापी आंदोलन मागे घेतले होते.

संबंधित बातम्या

Back to top button