शेतकर्‍यांचे कर्ज आता थेट दोन लाखांपर्यंत माफ होणार

जाचक अटी रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई /10 जुलै ; अनेक नेत्यांनी कर्जमाफीसाठी केले होते आंदोलन, जाचक अटी रद्द करण्याची केली होती मागणी ‘पुण्यश्लाक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत शेतकर्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. कर्जमाफी
आता लांबणार असल्याची चिन्हे आहेत. अनेक शेतकर्‍यांनी व नेत्यांनी योग्य कर्जमाफी व्हावी यासाठी आंदोलन पुकारले होते.
यापुर्वी 50 हजारांची मर्यादा आणि कर्ज परतफेडीच्या जाचक अटी पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. आता नवीन
घोषणेनुसार कर्जमाफीसाठी नियमीत कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांची रक्कम 2 लाखांच्या आत असेल तर पात्र शेतकर्‍ंयांचे
कर्ज माफ होणार आहे. आता या घोषणेनुसार आता थकबाकीदार आणि नियमित कर्ज परतफेड करणार्‍या पात्र
शेतकर्‍यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाईल. महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकर्‍यांना पूर्वी
50 हजार रुपयांपर्यंतच लाभ मिळण्याची तरतूद होती, ती आता2 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच 2026-27 च्या पीक कर्जाची अटही रद्द केली आहे.कर्जमाफीसाठी अनेक जाचक अटी होत्या त्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी मोठा मोर्चा काढला होता. तसेच आमदार रोहीत पवार यांनीही पंढरपूर येथे कर्जमाफीसाठी आंदोलन केले होते. या योजनेचा फायदा राज्यातील सुमारे 56 ते 58 लाख शेतकर्‍यांना होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button