हॉटेल्समध्ये ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणे बंधनकारक
तुकाराम मुंढे यांचे निर्देश, नियमांचे उल्लंघन करणार्यांची कोणतीही गय केली जाणार नाही

मुंबई/24 जून– राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सध्या ’सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व अन्न व्यावसायिकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे, खानावळी आणि ज्या-ज्या ठिकाणी अन्नप्रक्रिया केली जाते, अशा सर्व आस्थापनांनी अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणार्यांची कोणतीही गय केली जाणार नाही आणि त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नियम पाळणे बंधनकारक-तुकाराम मुंढे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, अन्नात कुठेही भेसळ होऊ नये यासाठी काही पावले उचलण्यात येतात,
मोफत शुद्ध पाण्याचे निर्देश आणि कारवाईचा इशारा
अन्नसुरक्षेसोबतच ग्राहकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मुंढे यांनी गांभीर्याने घेतला आहे. प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटने ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मोफत उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. तसेच, ग्राहकांना माहिती व्हावी यासाठी ’येथे पिण्याचे शुद्ध पाणी मोफत मिळेल’ अशा आशयाचा फलक दर्शनी भागात लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या सर्व नियमांची आणि सूचनांची योग्य अंमलबजावणी न करणार्या आस्थापनांवर प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात येईल.




