श्री रुख्मिणी मातेच्या पालखीचे वायएसपी पार्टीच्यावतीने स्वागत

सुनिल राणा व उपमहापौर सचिन भेंडे यांची उपस्थिती

अमरावती /23 जून: आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर कौडण्यपूर येथून पंढरपूरकडे निघालेल्या श्री रुक्मिणी मातेच्या पालखीचे अमरावती नगरीत आगमन होताच सर्वत्र भक्तीचा महापूर लोटला. राजापेठ चौकात युवा स्वाभिमान पक्षातर्फे पालखीचे अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती, तर विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकर्‍यांचे स्वागत फुलांची उधळण करून करण्यात आले. युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा यांनी पालखीचे विधिवत पूजन करून आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाचा गौरव करताना सांगितले की, ही थोर परंपरा समाजाला एकता, समता आणि माणुसकीची शिकवण देते. या सेवा सोहळ्यात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वारकर्‍यांना चहा, नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले. पालखीसमोर महिला पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी पारंपरिक फुगड्या खेळत आपला आनंद व्यक्त केला, ज्यामुळे वातावरणात चैतन्य पसरले होते. या वेळी सुनील राणा यांच्यासह उपमहापौर सचिन भेंडे, नाना आमले, डॉ. प्रिती हर्षल रेवणू, किशोर जाधव, संजय हिंगणपुरे, सुमती ढोके, अजय मदनमोहन जयस्वाल, दीपक किसनलाल साहू, नंदा धनंजय सावदे, रजनी राजेश डोंगरे, गौरी शैलेंद्र मेघवानी, महेश धनराज मूलचंदानी, योगेश रघुनाथ विजयकर, अर्चना, प्रियंका भूषण पाटणे, मिराबाई कांबळे, मधुरा मिलिंद कहाळे, मिलिंद बांबळ, शैलेंद्र कस्तुरे, अशोक पांडे, बाळू इंगोले, प्राध्यापक गाडे सर, तुषार दुधे, नितीन खडसे, वंदना जामनेकर, अविनाश काळे, कमळकिशोर मालानी, शोभाताई किटके, चंदा लांडे, कोकिळा इंगळे, अलका वायधने, विना विधिये, दिपा धाकड, शिल्पा सावदे, संजय मुनोत, आनंद जयस्वाल, अर्चना पांडे, सुरज मिश्रा, शाम कथे, जयंतराव वानखडे, राजेश दावथोरे, मनोज ढवळे, गणेश हिप्परकर, अजय बोबडे, संकेत गाडे, आतिश इंगळे, सतीश कडू, पवन कापशीकर, समीर शेंडो, महानंदा कातोरे, प्रतिभा पाचपोटे, राहुल जयस्वाल, दीपक खटोले, भूषण पाटणे, आशिष माहुरे, युवराज लबडे, गोकुल खोडके, विजय सौदागर, मिलिंद कहाळे, अशोक पांडे, मारोतराव कोहळे, निलेश मस्तकं, दीपक खटोले, बबनराव रडके, नितीन बोराकर, इंदरचंद सुराणी, अभय कोराचा, अमरथ मुथा, अनिल मिश्रा, नरेश अटकाळे, प्रविण लवाटे, दीप शर्मा, आशिष गावंडे, अमोल पवार, दीपक ताथोडे, मंगेश इंगोले, शितल लांजोवार, छोटू आकोटकर, जगदीश गुल्हाने, राजू निहार, अनिकेत शेगोकार व रुपेश कळसकर यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते.सेवेचा लाभ घेताना भाविकयुवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकर्‍यांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि आवश्यक सोयीसुविधांची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. वारकर्‍यांनी या सेवा कारबद्दल समाधान व्यक्त करून आयोजकांचे मनापासून आभार मानले.

संबंधित बातम्या

Back to top button