माती परीक्षण व शिफारशीनुसार खत व्यवस्थापनाचे महत्त्व
विद्यार्थ्यांचे शेतकर्यांना मार्गदर्शन

अमरावती /17 जून: देवरी (जि.अमरावती), दि. 30 मे 2026 ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती येथील विद्यार्थ्यांनी देवरी गावात माती परीक्षणाचे महत्त्व व मृदा परीक्षण अहवालानुसार खतांचा वापर करण्याबाबत जनजागृती केली. वेदांत बोकाडे, अधिकांश बारबैले, गौरव दहीकर, समीर देशमुख, वेदांत देशमुख आणि हेमांशू थोटे या विद्यार्थ्यांनी शेतकर्यांना माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची अचूक माहिती मिळते तसेच आवश्यकतेनुसार संतुलित खत व्यवस्थापन करता येते, याबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन पीक उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना या कार्यक्रमास डॉ. दीपक पाडेकर (सहाय्यक प्राध्यापक, मृदा विज्ञान विभाग, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी मृदा आरोग्य जपण्यासाठी नियमित मृदापरीक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले तसेच शिफारशीनुसार खतांचा वापर करण्याचे आवाहन विद्यार्थ्यां मार्फत शेतकर्यांना केले. ग्रामीण भागातील शेतकर्यांमध्ये वैज्ञानिक शेतीविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास गावातील शेतकरी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




