मनपाच्या आरोग्य विभागातील जन्म मृत्यू दाखले सी आर एस प्रणाली द्वारे देण्यात येणार

डॉ. विशाल काळे यांचे जाहीर आवाहन

अमरावती/3 जून- महानगरपालिका कार्यक्षेत्रात खाजगी दवाखान्यात व महानगरपालिका कार्यक्षेत्रात जन्म मृत्यू घटनाबाबतची नोंद व जन्म मृत्यू दाखले अमरावती महानगरपालिका मार्फत देण्यात येते. केंद्र सरकारच्या सिविल रजिस्ट्रेशन सिस्टीम या सी आर एस सॉफ्टवेअर मार्फत त्याची नोंदणी होत आहे . -वव जश्रव र्शींशपीं नोंदणी साठी शासनाच्या धोरणानुसार या कार्यपद्धतीतून शासनामार्फत मासिक 2000 इतके नोंद घेण्यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्या जुन्या नोंदी उपलब्ध आहेत व त्यांना जुने दाखले मिळालेले आहेत परंतु नवीन सॉफ्टवेअर मधून दाखले द्यायचे आहे अशा नोंदीसाठी मर्यादा आलेली आहे. त्यामुळे या मर्यादेतच व सर्व कागदपत्रे तपासून ड ओल्ड इव्हेंट द्वारे नोंदणी केले जाणार आहे. व वरील बंधनासाठी जन्म मृत्यू विभागासोबत सहकार्य करण्याचे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी केलेले आहे. नियमित नवीन होणार्‍या नोंदी वर याचा परिणाम होणार नाही तसेच ज्यांचे सीआरएस या पोर्टलमध्ये नोंदणी आहे त्यांना सदर बाबतीत कोणतीही अडचण नाही. तरी जन्ममृत्यू विभागातील कर्मचार्‍यांशी सहकार्य करावे यासाठी जाहीर आवाहन डॉ विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी अमरावती शहरवासी यांना केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button